Gudhi Padwa Function
Fair Oaks, April 2, 2006
गुढी पाडवा वॄत्तांत
प्रभु आले मंदिरी
शरयु नदी हिमालयातल्या मानस सरोवरात उगम पावून पुढे गंगेला मिळते. ह्या शरयु नदीच्या तीरावर कौसल देश वसलेला होता. त्या देशाची राजधानी अयोध्या. ह्या कौसल देशावर रघू कूळचे राज्य होते. ह्यात अंबरीष, नहूष, ययाती, दशरथ असे महापराक्रमी, गुणवान व नीतिमान राजे होऊन गेले. राजा दशरथास कौशल्या, सुमित्रा व कैकयी अश्या तीन राण्या होत्या. पूर्वी जवळपासचे राजे आपल्या मुलींचे विवाह पराक्रमी राजाशी करत असत. स्वतःच्या राज्याची सुरक्षितता साधण्याचा हा एक राजकारणी उपाय असे. त्यामुळे त्यावेळच्या प्रथेप्रमाणे राजा दशरथास आणखी खूप राण्या होत्या. सर्व सुख असून सुद्धा राजा नेहमी कष्टी असे. अजुन तो पुत्र सुखास पारखा होता. गुरुदेव वसिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्यानंतर पायस प्रसादाने व परमेश्वरी संकेताने, राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न अशी मुले झाली.
ज्येष्ठ पुत्र राम जेव्हा १५ वर्षाचा झाला त्यावेळी व्रुद्ध दशरथाने रामास युवराज्याभिषेक करावा असा संकल्प केला. पण त्याची आवडती व तरुण राणी कैकयी हीने त्यास मोडता घातला. भरतास राज्य व रामास १४ वर्ष वनवास असा हेका तिने धरला. कैकेयीमातेची इछा हीच पित्रूआज्ञा समजून राम, सीता व लक्ष्मण ह्यांच्या सह वनवासाला गेला. तेथे त्यांच्यावर अनेक संकटे आली. क्षणिक मोहामुळे लंकाधीपती रावणाने सीतेचे हरण केले. त्या रावणाचा वध करुन सीतेसह लक्ष्मण व श्रीराम, १४ वर्षाचा वनवासानंतर अयोध्येला परत यावयास निघाले आहेत. दरम्यान कौसल देशात बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. मुख्य म्हणजे राजमाता कौशल्या, सुमित्रा व कैकेयी तिघीजणी राजा दशराथानंतर एकोप्याने राहत होत्या. श्रीराम सीतेचे स्वागत करुन त्यांचा राज्याभिषेक करायचा ह्या हेतुने सारा अयोध्या परिसर प्रत्यक्ष राजवाडा फुलांच्या माळा तोरणे पताका, गुढ्या उभारुन सुशोभीत केला होता. सारे अयोध्यावासीय ठेवणीतले नवे कपडे घालून अयोध्येच्या वेशीपासून राजवाड्यापर्यंतच्या रस्त्याच्या दोनीही अंगास ऊभे राहून श्रीराम सीतेची प्रतिक्षा करीत होते. तो दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा होय. हाच दिवस आपण सारे जण गुढि पाडवा म्हणून साजरा करतो.
हे सगळे का बरे सांगितले? तर आज हे सारे, पुन्हा एकदा सॅक्रामेंटोवासी मराठी मंडळतील उत्साही बंधू आणि भगिनींनी सर्वस्वी हेची देखी डोळा उभे केले. २ एप्रिल २००६ या दिवशी, सुमारे १०० मंडळी जमली होती. त्यात मुलांचा उत्साह दांडगा होता. त्यांचे आई वडिल, आजी आजोबा हे सुद्धा तितक्याच उत्साहाने सामील झाले होते. राजश्री देशपांडे यांनी मस्त चहा करुन आणला होता. खमंग भजी बरोबर गरमागरम चहा घेवून कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाची सूरूवात गणपतीस्तोत्राने झाली. शूभांगी केळेकर, आशीष घारपूरे, सायली नातू यांनी हे स्तोत्र म्हणून गणपतीपूजनाची मराठी प्रथा कायम राखली.
नंतर गूढी उभारण्याचे व राम-सीता आगमन व राज्याभिषेक यावर मराठीत लिहिलेले स्किट सादर करण्यात आले. ह्याच्या सूंदर स्किट्चे लेखन व संकल्पना श्री. अजित नातू आणि त्यांची पत्नी माधूरी नातू यानी केली. ते म्हणाले की अमेरीकेतील मूलांना गूढी व रामराज्याची कदाचित ऎकीव माहिती असेल पण जर प्रत्यक्ष त्याचे नाट्य उभारले व त्यातून मूलांकडवूनच ते जर करवून घेतले तर त्यांना त्याबद्द्ल कूतूहूल वाटेल व माहिती कायम स्वरूपात मनात टिकून राहिल. स्किटची संकल्पनाच अशी होती की गूढीची माहिती, रामाच्या अयोध्येतले प्रत्यक्ष संवाद व प्रवेश, मूलांकडून गूढी ऊभारून घेणे, राम आणि सीतेचे आगमन, राज्यातून त्यांची सिंहासनाकडे वाटचाल, राम-राज्याभिषेक , मूलांना समर्पक भाष्य, त्यालालागूनच भगिनींचे हळ्दीकूंकू. हे सगळे जसे माळेतील मणी तसे गूंफले होते. स्किटच्या सूरवातीस, स्मिता घारपूरे यांनी मूलांचे लक्ष संवादातून आपल्याकडे करवून घेतले व माहीतीपूर्वक अशी गूढीची व त्या प्रथेची ओळख करवून दिली. स्मिताताईंची तयारी छान होती व आवाजावर उत्तम कमांड दिसत होता. स्किट्च्या पुढील भागात, प्रत्यक्ष अयोध्येतला सिन सूरू झाला. त्यात चि. सायली नातू व तिची आई सौ. माधुरी नातू ह्यांनी आपल्या संवादातून सुंदर वातावरण निर्मिती केली. साऱ्या छोट्या मंडळीनी आपल्या आईवडीलांच्या मदतीने गुढ्या बांधल्या. मोठ्यांनी श्रीराम राज्याभिषेकाचे दालन सजवले. लाल पायघड्या घातल्या, सजवलेल्या सिंहासनामागे रंगीत छत्र ऊभे ठेवले होते. सर्व जण स्थळकाळ विसरून, श्रीरामचंद्र व सीतामाईची वाट पहात होते. ८ वर्षाचे चि.संजीत जैन व चि.अवनी केळेकर, श्रीरामचंद्र व सीतामाईच्या वेषात, गंभीरतेने सावकाश पावले टाकीत येत होते. त्या दोघांच्या मागे त्यांच्याच वयाची प्रजा तितक्याच दक्षतेने पावले टाकीत, श्रीरामाचा जयजयकार करीत सिंहासनाच्या दिशेने चालत होती. राम सीतेवर छत्रचामर दोन भगिनींनी धरले होते. राम-सीता एवढे सुरेख, साजेसे दिसत होते, त्यांचा पोशाख, धनुष्य-बाण, मुकूट सगळे कसे विलोभनीय. पाठीमागच्या प्रजेत तर एक वर्षाच्या देखण्या `आर्यन' पासून मोठी मूले सामील होती. सारेच दृष्य अतिशय विस्मयकारक व डोळ्यांना सुख देणारे होते. "विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी" हे माणिक वर्मा यांचे पाठीमागे गाणे किती समर्पक लावले होते. ह्यानंतर सौ. शीला कुळकर्णी यांनी मुलांना ऊद्देशून असे समर्पक भाषण केले. त्यासाठी त्यानी बरीच तयारी केली होती व मूलांना पंचांग, सरस्वती, रामाचा महिमा अशी बरीच माहीती दिली. विशेष म्हणजे मूले लक्ष देऊन ऎकत होती बर का !
ह्या सर्व स्किट्साठी सर्व मंडळीनी खुप परिश्रमपुर्वक तयारी केल्याचे जाणवत होते. ह्या सर्व कार्यक्रमाची तयारी व परिश्रम अजित नातू, माधूरी नातू व सायली नातू, आशिष घारपूरे, स्मिता घारपूरे यांनी केली व मूलांच्या आई-वडिलांनी गूढि बांधायची तयारी चांगली केली होती.
जणू रामाचे आगमन साजरे करण्यासाठी (व गूढि पाडव्याच्या निमित्ताने) ह्यानंतर सर्व स्त्रियांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. त्याची तयारी पल्लवी सावंत, शुभांगी केळेकर, अंजली सेठ यांनी मिळून केली.
ज्याची सर्वांना अत्यंत आतुरता होती त्या संगीत अंताक्षरीची सुरवात लवकरच झाली. सौ शिल्पा व श्री हरिश जैन यांनी समर्थ असे सुत्र संचालन करुन एलिमिनेशन खेळींनंतर दोघा दोघांचे ५ गट केले. ह्या गटांना मल्हार, मालकंस, बसंत, दरबारी व भैरवी अशी योग्य नावे देवुन अंताक्षरीचा हा कार्यक्रम रंगवला. हरिश व शिल्पा यांनी वरील नावाच्या पट्ट्या इतक्या छान सजवल्या की बघतच बसावे. चि. सायलीने प्रत्येक गटास योग्य अंक देऊन प्रत्येक गटाची गुणवत्ता ठरविली. तासा-दिडतासाचा चढाओढीचा कार्यक्रम अतिशय रंगला. त्याला योग्य साथ व त्यात भाग घेऊन श्रोत्यांनीही वाहवा मिळविली. मल्हार (अनिकेत ब्रीद व शुभांगी केळेकर) व मालकंस (विजय वाकोडे व माधवी जैन) गटाने पहिले व दुसरे पारितोषिके पटकाविली. अनिकेतने तर जोमाने गाणी म्हणून धमाल आणली तसेच इतर पार्टींनीपण खूप लढत दिली. अनिकेतला शुभांगीने योग्य वेळी गाणी म्हणून अग्रक्रम राखण्यास साथ दिली, तर आयत्या वेळी मिळालेल्या संधीला विजयने विजयात रूपांतर केले. त्याला नविनच मेंबर बनलेल्या माधवीने मस्त गाणी म्हणून विजयासाठी मोठी मदत केली. श्री व सौ कर्णीक यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके/ट्रॉफीज देऊन त्यांचा गौरव केला. माधूरी नातूने आणलेल्या ह्या ट्रॉफीज बघण्या सारख्या होत्या. श्री शशांक देशपांडे व श्री सचिन पदमवार या दोघांनी संगणकाच्या साहाय्याने द्रुकश्राव्याचा आनंद प्रेक्षक व श्रोत्यांना बरोबरीने मिळवून दिला. त्यांच्या या कामगिरीने आणखीनच बहार आली. ह्या अंताक्षरीची तयारी खूप दिवस चालू होती व त्यात शिल्पा व हरिश जैन, शशांक आणि राजश्री देशपांडे व श्री सचिन आणि शिल्पा पदमवार, अजित, माधूरी, सायली नातू यांचे अथक परिश्रम दिसून येत होते. होस्ट म्हणून जैन कपल तर एकदमच शोभले व त्यांनी सुंदर नियंत्रण ठेवले. प्रेक्षकांना ऑडिओ व व्हिजुअल तयारी बघून, शशांक व सचिनचे मोठे कौतूक वाटले. एकंदर प्रेझेंटेशन हाय लेव्हलचे होते. कूडोझ टू अंताक्षरी टिम.
कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्र "शूर आम्ही सरदार" समूह गीत गाऊन केली. टिव्हीवर या गाण्याची कविता व संगीत एकत्र प्रक्षेपित करण्यात आली ज्यामूळे प्रेक्षकांना साथ साथ आवाज मिळवून देता आले. समूह गीताचा हा ऊपक्रम स्तूत्य आहे व तो असाच चालू ठेवावा ही विनंती.
श्री अजित नातू यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन, संकल्पना सुसूत्रतेने केली. त्यांचा वाटा मोलाचा आहे. त्यांना सर्वेतोपरी अनेक पडद्यामागील मंडळीची मोलाची मदत झाली. श्री. ऊपेन्द्र कुलकर्णी यांनी नेहमीच्या सहजतेने हसत हसवत सर्व कार्यक्रमाचे संचालन केले. नातू म्हणाले की मंडळ जोर तर घेते हे खरे, तरी बाकीच्या सभासदांनी जर सक्रीय मदत केली तर अजून भरपूर काही करता येईल.
नंतर सर्वांनी एकत्रित भोजन केले. सौ. बीना दोंदे यांच्या पाककौशल्याचा आस्वाद घेत, गप्पा मारत मारत, मजा आली. सर्व मंडळी अतिशय खुष होती, रमली होती. सॅक्रामेन्टो मराठी मंडळाचा गुढि पाडव्याचा सण मोठा आनंदात साजरा झाला. या समांरभाचे प्लानिंग, तयारी, सर्व बारीक बारीक गोष्टींची तयारी परिपूर्ण होती व सभासदांंमधली खेळीमेळी किती छान दिसून येत होती.
रामायणाच्या काळापासून वाल्मिकी रामायणाचे गायन ऐकून, ऐकवून मराठी माणसाने जिवंत ठेवले आहे. श्रीराम हे आदर्श पुरुष व सीतामाई ही आदर्श पत्नी अशी जनमानसात त्यांची प्रतिमा आहे. मराठी माणसाच्या आदर्शतेचा, सदगुणांचा, धैर्यांचा, शौर्याचा, आदर्श म्हणजे श्रीरामचंद्र व सीतामाई होत. विसाव्या शतकात रामायण लिहिण्याचा मान कविवर्य ग. दि. माडगुळकरांकडे जातो. गायक श्री. सुधिर फडके यांनी जनमनात पक्के रुजवले आहे.
शेकडो वर्षाच्या राम गायनामुळे वेळोवेळी त्यात अनेक कथा, ऊपकथांचा प्रक्षेप झाला. ते ऐकून ऐकून आपण श्रीरामचंद्रांना देवत्व दिले. पण श्रीराम हा आपल्यासारखाच माणुस होता हे जर आपण लक्षात घेतले तर श्रीरामाचे मोठेपण आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवेल. आपल्या मनात असलेला अभिमान हा अधिक सार्थ असेल. थोड्याफ़ार प्रमाणात, हेच आपण पुढील पिढ्यांना सांगू इच्छितो. ह्यातलाच एक भाग म्हणून सॅक्रामेन्टोवासी ह्यानी हा गुढि पाडवा श्रीरामचंद्र व सीतामाईंच्या अयोध्या प्रवेशाने साजरा केला.
विजय पताका श्रीरामाची
झळकते अंबरी,
गुढ्या तोरणे घरोघरी
प्रभु आले मंदिरी
मराठी मंडळ सॅक्रामेंटोची सुरवात मागच्याच वर्षी झाली. तसे पाहीले तर मंडळ, वयाने अतिशय लहान आहे. पण प्रगती जोरात आहे. ह्यात सगळ्यांचाच सहभाग आहे. मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. व त्या निमित्ताने साऱ्यांच्या गाठीभेटी होवोत हीच इच्छा.
चिरंजीव भव.
धन्यवाद
कुमार कुलकर्णी.